शिरूरमध्ये आदिती तटकरे यांची रॅली

शिरूरमध्ये आदिती तटकरे यांची रॅली

शिरूर, ता. ११ : शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या शिरूर शहर व परिसरातील प्रचाराची सांगता शहरात पदयात्रा; तर उपनगरांत मोटारसायकल रॅलीने झाली. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या रॅलीत महायुतीचे कार्यकर्ते आणि विशेषतः महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत रामलिंग महाराजांच्या मंदिरात जाऊन आदिती तटकरे यांनी दर्शन घेतले व तेथूनच रॅली काढली. रॅलीदरम्यान शहरातील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या, एसटी स्टॅण्डसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नगर परिषदेच्या आवारातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यांना त्यांनी पुष्पहार अर्पण केले. शहरातील पुरातन राम मंदिरात जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.
माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्नील ढमढेरे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस रेश्मा शेख, राजेंद्र क्षीरसागर, रवीबापू काळे, संतोष शितोळे, शरद कालेवार, आरती भुजबळ, ऋतिका झांबरे, एजाज बागवान, नितीन पाचर्णे, मितेश गादिया, विनोद भालेराव, हुसेन शहा, मयूर थोरात, नीलेश जाधव, अंजली थोरात, रंजन झांबरे, अविनाश जाधव, नीलेश नवले, रश्मी क्षीरसागर आदी या रॅलीत सहभागी झाले होते.
शहराच्या काही भागात पदयात्रा काढून आदिती तटकरे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तर उपनगरांत दुचाकी रॅली काढून संपर्क मोहीम राबवली. आढळराव यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव पाटील यादेखील काही काळ त्यांच्या समवेत होत्या.

आढळराव पाटील यांनी शिरूर मतदारसंघात सर्वच समाजघटकांसाठी भरीव विकासकामे केली असून, अफाट जनसंपर्कातून सातत्याने ते जनतेच्या मदतीला धावून आले आहेत, लोकांच्या अडीअडचणीत उभे राहिले आहेत. या मतदारसंघात फिरताना त्यांच्या कामाची प्रचिती येत असून, या कामांतून त्यांचा विजय निश्चीत आहे. मतदारांचा त्यांना असलेला पाठिंबा व महायुतीविषयी असलेले उत्साहाचे वातावरण यातून त्यांचा विजय समीप आला आहे.
- आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com