

शिरूर, ता. २ : शेतकरी राजाचा सच्चा साथी असलेल्या सर्जा - राजाची आज ठिकठिकाणी व विशेषतः शेतकरी कुटुंबांत मनोभावे पूजा करण्यात आली. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे बैलपोळ्याचा विशेष उत्साह होता. ढोलताशाच्या गजरात, भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत, दैवतांच्या जयजयकारात सजविलेल्या बैलांची सामुहीक मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच रांजणगावबरोबरच परिसरातील गावांतील ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिरूर तालुक्यात व परिसरात भाद्रपद बैलपोळा साजरा केला जातो. त्यादृष्टीने आज खेड्यापाड्यात विशेष उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण होते. शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली असली; तरी आजही अनेक शेतकरी कुटुंबात बैलांची मनोभावे जोपासना केली जाते. शिरूर परिसरात विशेषतः जुने शिरूर, अण्णापूर येथे बैलपोळ्याचा उत्साह जाणवला. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातल्यानंतर आपापल्या परीसरातील दैवतांच्या मंदिरांपर्यंत मिरवणुका काढण्यात आल्या.
ग्रामप्रदक्षिणेनंतर, सजविलेल्या बैलांची मिरवणूक महागणपती मंदिरासमोर आली. त्यावेळी उपस्थितांनी महागणपती मोरया चा गजर केला. तेथेही बैलांवर भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. बैलांना महागणपती मंदिराच्या दारात नतमस्तक केल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
04229
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.