कर्डेलवाडीला विहिरीत बिबट्याचा बुडून मृत्यू
शिरूर, ता. ९ : कर्डेलवाडी येथे शिरूर- अण्णापूर रस्त्यालगत ढग्या डोंगराजवळील एका विहिरीत बुडून मंगळवारी (ता. ८) सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याचा मृत्यू झाला.
ढग्या डोंगराजवळील कऱ्हेवाडा- कुरंदळे वस्तीदरम्यान गर्द झाडीतील विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज येत असल्याने काही तरूणांनी विहिरीकडे जावून पाहिले असता विहिरीच्या पाण्यात बिबट्या असल्याचे दिसले. हा बिबट्या कधी वीजपंपाच्या पाईपला, तर कधी आजूबाजूच्या झुडपांना धरून वर येण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, त्यात अपयश येत असल्याने तो वारंवार पाण्यात पडत होता. दरम्यान कर्डेलवाडीचे पोलिस पाटील किशोर कर्डिले यांनी वनखात्याला याबाबत कळविले. त्यानंतर वनपाल संतोष म्हेत्रे हे बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत पाण्यात पोहून दमलेला बिबट्या पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. रेस्क्यू टीमने दोरीच्या साहाय्याने बिबट्याला बाहेर काढले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता, असे शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, बिबट्या पडलेल्या विहिरीला कठडे नव्हते. शिवाय पाणी भरपूर होते. भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळेसच हा बिबट्या विहिरीत पडला असावा. मात्र, या विहिरीला कठडे नसल्याने, तसेच आजूबाजूला कपारी देखील नसल्याने आणि आधारासाठी कुठलाही टेकू न मिळाल्याने पाण्यात पोहून दमलेला बिबट्या बुडाला होता, अशी माहिती जगताप यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

