खंडाळे माथा येथे मुलाचा
मोटारीच्या धडकेत मृत्यू

खंडाळे माथा येथे मुलाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू

Published on

शिरूर, ता. १९ : पुणे- नगर रस्त्यावर खंडाळे माथा (ता. शिरूर) येथे दूध आणण्यासाठी गेलेल्या कुमारवयीन मुलाचा रविवारी (ता. १६) रात्री अज्ञात मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. रोहित दीपक धामणे (वय १४, रा. खंडाळे माथा) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत त्याचे वडील दीपक माणिकराव धामणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मोटारचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे लोनबेळ (ता. आरणी, जि. अहिल्यानगर) येथील राहणारे दीपक धामणे हे खासगी कंपनीत कामाला असून, सध्या कुटुंबासह खंडाळे माथा येथे वास्तव्यास आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहित हा दूध आणण्यासाठी महामार्गालगत असलेल्या एका दुकानात गेला होता. दूध घेऊन रस्ता ओलांडत असताना अहिल्यानगर बाजूने पुणेकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने त्याला ठोकरले. अपघातानंतर मोटारचालक न थांबता मोटारीसह निघून गेला. स्थानिकांनी जखमी अवस्थेतील रोहित याला शिक्रापूर येथे खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com