

शिरूर, ता. ९ : कंपनीसाठी लागणारी नवीन मशिन खरेदी करताना ऑनलाइन सायबर फसवणुकीत एका व्यावसायिकाने गमावलेली २० लाख रुपयांची रक्कम अखेर परत मिळवून देण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील सुहास पंढरीनाथ मलगुंडे यांची ‘डी. एस. व्ही. पॉलिमर्स’ या नावाची कंपनी आहे. या कंपनीसाठी नवीन मशिनरी खरेदी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘ईझूमी ॲडव्हान्स प्रोसेसिंग टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी संपर्क साधला. मात्र, त्रयस्थ व्यक्तीने त्यांचा कंपनीशी झालेला पत्रव्यवहार मिळवून त्यांना ई-मेलवर संपर्क साधला. या ई-मेलमधील जिथे पैसे पाठवायचे त्या कंपनीचे नाव, संपर्क क्रमांक, मशिन एकसारखेच होते. फक्त खाते क्रमांकातील एक-दोन आकडे वेगळे होते. मलगुंडे यांना हे कंपनीचे आणखी एखादे खाते असावे, असे वाटल्याने त्यांनी वीस लाख रुपये त्या खात्यावर पाठवले, पण लगेचच कंपनीच्या सेल्समनशी संपर्क साधला. मात्र, ते खाते कंपनीचे नसल्याचे समजल्यावर मलगुंडे पोलिसांना ही बाब कळवली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून जिथे पैसे पाठविले होते, त्या बॅंकेशी ऑनलाइन पत्रव्यवहार करून पैसे रोखण्यास कळविले.
याबाबत त्यांनी सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवताच शिरूरचे प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे महादेव वाघमोडे, अशोक चव्हाण, सायबर पोलिस पथकाने तपास हाती घेतला. तातडीने बँकेशी पत्रव्यवहार करून न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्कम मलगुंडे यांना परत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.