श्रीधर तांबे यांचे निधन

श्रीधर तांबे यांचे निधन
Published on

शिरूर, ता. १४ : सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर दशरथ तांबे (वय ६९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी महेश तांबे व आयपीएस अधिकारी, पीएमआरडीएचे पोलिस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल तांबे यांचे ते वडील; तर पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अर्चना अमोल तांबे यांचे ते सासरे होत. तांबे यांनी शिरूरसह खेड, जुन्नर, आंबेगाव, दौंड या तालुक्यांत तलाठी व मंडल निरीक्षक, मंडल अधिकारी म्हणून सेवा बजावली. भोर तालुक्यात २०१४ ला कार्यरत असताना नायब तहसीलदार पदावरून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळ वी गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे  शेतीत वेगवेगळे प्रयोग करत, आधुनिक पद्धतीने शेती करून एक प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविला. कोरोना काळात गावात कोविड सेंटर उभारण्यापासून, शाळांना मदत करत सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
04833

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com