कोरेगावातील हल्ल्यातील आरोपींना बीडमध्ये पकडले

कोरेगावातील हल्ल्यातील आरोपींना बीडमध्ये पकडले

Published on

शिरूर, ता. २५ : आपल्या मित्राकडे खुन्नसने बघितल्याच्या रागातून कारेगाव (ता. शिरूर) येथील प्लेटोर सोसायटीसमोर रविवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास अल्पवयीन तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून तीन दुचाकीवरून पळून गेलेल्या सातजणांच्या टोळक्याला पुणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केज जवळ (जि. बीड) पाठलाग करून पकडले.
या हल्ल्यात सौरभ श्रीराम राठोड (वय १७, रा. कारेगाव, ता. शिरूर, मुळ रा. शिवाजीनगर, ता. गंगाखेड, जि. परभणी) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत यश राजू धनवटे (रा. रामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. शंकर जालिंदर करंजकर (रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशीव), ओम दत्ता चव्हाण (धानोरा, ता. करंजा, जि. वाशिम), रोहन रघुनाथ बोटे (भानगाव, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर), ओंकार विजय देशमुख (डोनवाडा, ता. वसमत, जि. हिंगोली), गिरीश गोविंद कऱ्हाळे (हिवरा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली), गोरख विठ्ठल मोरे (कृष्णानगर, ता. मुखेड, जि. नांदेड) व हर्षल सुरेश पारवे (रा. शिवानी, ता. शेणगाव, जि. हिंगोली) अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. ते सर्वजण सध्या कारेगाव येथे वास्तव्यास होते. शिरूर न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत (ता. २८) पोलिस कोठडी दिली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले असून, त्याला येरवडा येथील बालन्यायालयासमोर हजर केले.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविली. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या व तांत्रिक माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक निळकंठ तिडके, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, प्रवीण पिठले, विजय सरजिने, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर, माऊली शिंदे, रामेश्वर आव्हाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव यांनी केजजवळ दोन्ही बाजूंनी नाकेबंदी करीत तीन दुचाकीवरून पळून जात असलेल्या सात हल्लेखोरांना पाठलाग करून जेरबंद केले. केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनीही याकामी साहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com