शिरूर ग्रामीणच्या उपसरपंचपदी सचिन घावटे

शिरूर ग्रामीणच्या उपसरपंचपदी सचिन घावटे
Published on

शिरूर, ता. ११ : शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन भाऊसाहेब घावटे यांची बिनविरोध निवड झाली.
इतर सदस्यांना उपसरपंचपदाची संधी मिळावी म्हणून उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
नवीन उपसरपंच निवडीसाठी सरपंच शिल्पा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सभेत सचिन घावटे यांना उपसरपंचपदाची संधी देण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामपंचायत विकास अधिकारी पी. सी. केदारी यांनी जाहीर केले.
या निवडीनंतर झालेल्या सन्मान सोहळ्यात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते सचिन घावटे यांचा फेटा बांधून सन्मान केला. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव घावटे, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य दादा पाटील घावटे, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच अरुण घावटे, प्रथम लोकनियुक्त सरपंच नामदेवराव जाधव, माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे व विठ्ठल घावटे, माजी उपसरपंच संजय शिंदे, मेजर नामदेव घावटे, शिरूर ग्रुप सोसायटीचे अध्यक्ष अप्पासाहेब वर्पे, अण्णापूरचे माजी सरपंच किरण झंजाड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल वर्पे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्यामकांत वर्पे, भाजपचे तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, शिवसेनेचे तालुका संघटक रामभाऊ देवकर, युवा नेते सनी जाधव व विशाल घायतडक आदी यावेळी उपस्थित होते.
सरपंच शिल्पा गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. किरण घावटे यांनी सूत्रसंचालन केले. माजी उपसरपंच अभिलाष घावटे यांनी आभार मानले.
शिरूर ग्रामीणचा विस्तार वाढत असताना विकासाला चालना देण्यासाठी मी कटिबद्ध असून, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन रचनात्मक विकासकामांच्या माध्यमातून शिरूर ग्रामीणचा चेहरा- मोहरा बदलण्याचा संकल्प आहे. अनेक कामे प्रगतिपथावर आहेत, ती पूर्णत्वाला नेतानाच नवीन विकासाच्या योजनांतून या भागाचा कायापालट करण्यावर भर राहील, असे सचिन घावटे यांनी सांगितले.

SUR25B04962

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com