अण्णापूरमधील १३ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत पात्र
शिरूर, ता. १४ : राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या वतीने केंद्र शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत अण्णापूर (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
विद्यालयाचे १३ विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून, जान्हवी रासकर व कृष्णा रासकर या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांना केंद्रीय शिष्यवृत्ती प्रतिवर्षी १२ हजार रुपये याप्रमाणे ४८ हजार रुपये मिळणार असून, सार्थक कुरंदळे, गौरव वाळूंज, सार्थक वाळूंज, सानिका कुरंदळे, सार्थक सरड, सक्षम कुरंदळे, सार्थक वारघडे यांना सारथी शिष्यवृत्तीचे नऊ हजार ६०० प्रमाणे चार वर्षांत ३८ हजार ४०० रुपये मिळणार आहेत. वैष्णवी जाधव, कल्याणी कुऱ्हे, आविष्कार जाधव, ऋतुजा धीवर हे विद्यार्थीदेखील या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक भास्कर वाबळे, उपशिक्षक बबन गुंड, उपशिक्षिका धनश्री ताठे, उपशिक्षक एम. व्ही. एस. काझी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी व ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
SUR25B05002
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

