शिरूर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद
शिरूर, ता. १५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिरूर नगर परिषद व येथील राष्ट्रपिता महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राज्याच्या विविध भागांतून १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
अकरावी, बारावी या गटात सबा जुबेर सय्यद, पाचवी ते दहावी या गटात रूद्र फराटे आणि पहिली ते चौथी या गटात शुभांगी पवार हे विद्यार्थी विजेते ठरले. गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार ज्ञानेश्वर उर्फ माउली आबा कटके यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दीपप्रज्ज्वलनाने केले. दलितमित्र रमेश गायकवाड, समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव, सचिव प्रमोद गायकवाड, सुनील जाधव, एजाज बागवान, संतोष शिंदे, अतुल गव्हाणे, मधुसूदन पाठक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार व आजची आधुनिक विचारसरणी, महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार व आजची शैक्षणिक धोरणे हे विषय दिले होते. प्रा. सतीश धुमाळ, विवेक घोडेवार, मयूरी नगरे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : पहिली ते चौथी : प्रथम- शुभांगी विलास पवार, द्वितीय- स्वरा मयूर जाधव. पाचवी ते दहावी : प्रथम - रूद्र कृष्णा फराटे, द्वितीय- साईरूद्र किरण गायकवाड, तृतीय - आराध्या निरंजन यादव, उत्तेजनार्थ - सावली मनोज नाबगे व पार्थ अमित पवार.
अकरावी, बारावी : प्रथम- सबा जुबेर सय्यद, द्वितीय- विश्वास संतोष दसगुडे, तृतीय - ऋतिका श्रीनिवास पाचर्णे, उत्तेजनार्थ - राजेश कोंडू जाधव.
शिरूर : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देताना आमदार ज्ञानेश्वर कटके.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

