

शिरूर, ता. १८ : शहरातील कैकाडी आळी परिसरात मजुरी काम करणाऱ्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. १८) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
कुंडलिक धोंडिभाऊ बोटे (वय ५८, रा. कैकाडी आळी, शिरूर) असे गळफास घेतल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या पत्नी सुनीता कुंडलिक बोटे यांनी याबाबत शिरूर पोलिसांना खबर दिली. बोटे पती- पत्नी कैकाडी आळीत राहावयास होते व छोटी- मोठी मोलमजुरीची, लग्नकार्यात स्वयंपाकाची कामे करीत होते. गुरुवारी (ता. १८) रात्री सुनीता या स्वयंपाकाच्या कामासाठी बाहेरगावी गेल्या होत्या, तर कुंडलिकएकटेच घरी होते. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुनीता या घरी आल्या तेव्हा घराचा दरवाजा उघडाच होता. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कुंडलिक यांनी घराच्या छताच्या पत्र्याला असलेल्या ॲन्गलला दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. घाबरलेल्या अवस्थेतील त्यांनी आपल्या नातेवाइकांना मोबाईलवरून संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर शहरात राहात असलेल्या नातेवाइकांनी त्यांच्या घरी धाव घेऊन पोलिसांना कळविले. पोलिस आल्यानंतर नातेवाइकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने कुंडलिक बोटे यांना खाली काढून शिरूरच्या ग्रामीण रूग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.