

शिरूर, ता. २५ : पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत रांजणगाव गणपती (ता. शिरूर) हद्दीत खंडाळे माथ्याजवळील बंद पडलेल्या कंपनीच्या मागील बाजूस रविवारी (ता.२५) सकाळी तरुण महिलेसह दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. यामुळे खळबळ उडाली. तिहेरी हत्याकांडाप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत महिला अंदाजे २५ ते तीस वयोगटातील असून, तिच्या मृतदेहाजवळच दीड ते दोन आणि चार ते पाच वयोगटातील दोन मुलांचेही मृतदेह आढळून आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. श्वान पथकामार्फतही हल्लेखोरांचा शोध घेतला जात असल्याचे रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
पुणे-अहिल्यानगर मार्गावर खंडाळे माथा परिसरातील एका कंपनीच्या मागील बाजूस दुर्गंधी येत होती. तेथून जाणाऱ्या पादचाऱ्याने सकाळी साडेअकराच्या सुमारास खंडाळेच्या (ता. शिरूर) पोलिस पाटील सीमा खेडकर यांना कळविल्यावर त्यांनी पती पंडित खेडकर व इतर ग्रामस्थांसह जाऊन पाहिले असता तेथे अर्धवट जळालेले मृतदेह दिसून आले. याबाबत त्यांनी तातडीने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झुडपात महिला व तिच्या शेजारी दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले.
दरम्यान, शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक सविता काळे, रांजणगाव गणपतीच्या पोलिस पाटील सारीका पाचुंदकर, खंडाळे च्या पोलिस पाटील सीमा खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ढोले यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. यातील महिलेच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा असून, अज्ञात हल्लेखोरांनी खून केल्यानंतर हे मृतदेह निर्जनस्थळी आणून पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असावा. तथापि, पावसामुळे हे मृतदेह अर्धवट जळाले, अशी माहिती पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी दिली. घटनास्थळी पेट्रोलचा वास येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्यासह दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे आदींनी भेट दिली.
05215
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.