शिरूरमध्ये रंगला पंजे भेटीचा सोहळा
शिरूर, ता. ६ : या अली, या हुसेन... शहिद - ए - करबला हुसेन... च्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात रविवारी (ता. ६) येथे ताबूत आणि सवाऱ्यांची (पंजे) मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र व महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या मोहरम च्या सोहळ्यातील पंजे भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी येथील पाच कंदील चौकात मोठी गर्दी झाली होती.
भाजीबाजारातून सायंकाळी ताबूत व सवाऱ्यांची मिरवणूक निघाली. माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण यांनी हलवाई चौकात विविध ठिकाणांचे ठेले आणि कोठल्यांच्या प्रमुखांचा सन्मान केला. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलिस दलाच्या वतीने तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी नागरीकांच्या वतीने प्रमुखांचा सन्मान केला. हाफीज बागवान, नितीन गायकवाड, हुसेन शहा, समीर नसीम खान, फिरोज बागवान आदींसह सर्वधर्मिय नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूकीपूर्वी, माजी नगराध्यक्ष (स्व.) शहिदखान पठाण यांच्या ''छालवाले'' या ताबूताचे हुसेन शहा, मतिन पठाण आदींनी जागेवरच पूजन करून विसर्जन विधी पार पाडले. मुख्य मिरवणूकीत तालामुल्ला शा व मदारी वस्ती येथील ताबूत सहभागी झाले होते. विविध ठिकाणच्या सवाऱ्यांचीही (पंजे) फुलांनी सजवून मिरवणूक काढण्यात आली.
पाच कंदील चौकात पंजे भेटीच्या पारंपारिक सोहळ्यावेळी मोठी गर्दी झाली होती. वाद्यांचा गजर, हसेन - हुसेन यांच्या नावाचा जयघोष यामुळे उत्साह भरला. रात्री उशिरा करबला मैदान येथे धार्मिक विधीनंतर ताबूत व सवाऱ्यांचे विसर्जन झाले.
शहरातील मानाच्या समजल्या इमाम - ए - कासम या कोटल्याचे मुजावर अब्बासभाई सौदागर यांचे नुकतेच निधन झाल्याने या कोटल्यासमोर ताबूत व सवाऱ्या येताच सौदागर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे पुत्र एजाज सौदागर व फय्याज सौदागर यावेळी उपस्थित होते.
05341
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.