शिरूरमधील महत्त्वाच्या गावांत सरपंचपद खुले

शिरूरमधील महत्त्वाच्या गावांत सरपंचपद खुले

Published on

शिरूर, ता. ११ : निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिसूचनेअंतर्गत सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी (ता. ११) सोडतीद्वारे कायम करण्यात आले. अनेक मोठ्या व महत्त्वाच्या गावांचे सरपंचपद खुले झाल्याने शिरूर तालुक्याच्या बहुतांश गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे आखाडे रंगणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने यापूर्वीच सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले असून, उर्वरित ८९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण चिठ्ठ्यांद्वारे निश्चित करण्यात आले. मुख्य शासकीय इमारतीतील दालनात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत समिक्षा राहुल गिरमकर या शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते सरपंचपद आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. नायब तहसीलदार प्रकाश मुसळे व स्नेहा गिरीगोसावी, गट विस्तार अधिकारी आर. आर. राठोड आदी यावेळी उपस्थित होते. गावपातळीवरील प्रमुख व मानाचे कारभारीपद भूषविण्यासाठी उत्सुक असलेले अनेक इच्छुक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आरक्षण सोडतीनंतर यातील काहींच्या राजकीय इच्छा- आकांक्षांना धुमारे फुटले; तर अनेक महत्त्वाच्या गावांचे सरपंचपद आरक्षित झाल्याने राजकीय स्वप्नांचे इमले बांधलेल्यांचा पुरता हिरमोड झाला.
तालुक्यातील शिरूर ग्रामीण, सरदवाडी, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, रांजणगाव गणपती, मलठण, इनामगाव, टाकळी हाजी, सणसवाडी, ढोकसांगवी या महत्त्वाच्या व मोठ्या गावचे सरपंचपद खुले झाल्याने भविष्यात या गावांतून निवडणुकीच्या आखाड्यात राजकीय घमासान होणार आहे. शिक्रापूर, कोरेगाव भीमा, पाबळ, केंदूर, तर्डोबाची वाडी, न्हावरे, निमोणे, गुनाट, कोंढापुरी येथील सरपंचपदे महिलांसाठी राखीव झाले आहेत.

सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती : हिवरे, आमदाबाद, गोलेगाव, वाजेवाडी.
अनुसूचित जाती महिला : निमगाव म्हाळुंगी, जांबूत, मुखई, वढू बुद्रूक.
अनुसूचित जमाती : कुरुळी.
अनुसूचित जमाती महिला : माळवाडी, वडगाव रासाई.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : कासारी, शरदवाडी, अण्णापूर, कारेगाव, कोळगाव डोळस, मिडगुलवाडी, वाघाळे, पारोडी, खंडाळे, फाकटे, कवठे येमाई, आंधळगाव, कान्हूर मेसाई.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : चव्हाणवाडी, करडे, म्हसे बुद्रूक, पिंपरी दुमाला, वाडा पुनर्वसन, सादलगाव, पिंपळे जगताप, निमगाव भोगी, पिंपळसुटी, आलेगाव पागा, नागरगाव, बाभूळसर बुद्रूक, रावडेवाडी.
सर्वसाधारण महिला : केंदूर, जातेगाव बुद्रूक, बुरुंजवाडी, तर्डोबाची वाडी, खैरेनगर, धामारी, डिंग्रजवाडी, वरूडे, टाकळी भीमा, पिंपरखेड, न्हावरे, उरळगाव, चिंचोली मोराची, शिक्रापूर, गणेगाव दुमाला, निमगाव दुडे, शिंदोडी, विठ्ठलवाडी, निर्वी, पाबळ, निमोणे, कोंढापुरी, गुनाट, दरेकरवाडी, मोटेवाडी, आपटी, कोरेगाव भीमा, आंबळे, कळवंतवाडी, धानोरे.

या गावांचे सरपंचपद खुले
भांबर्डे, सविंदणे, बाभूळसर खुर्द, चिंचणी, शिरूर ग्रामीण, काठापूर खुर्द, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, टाकळी हाजी, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, कर्डेलवाडी, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, सोनेसांगवी, दहिवडी, सणसवाडी, मलठण, रांजणगाव गणपती, सरदवाडी, इनामगाव, खैरेवाडी, जातेगाव खुर्द, गणेगाव खालसा, करंजावणे, पिंपळे खालसा, ढोकसांगवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com