कारेगावात राहणाऱ्या चार बांगलादेशी घुसखोरांना बेड्या

कारेगावात राहणाऱ्या चार बांगलादेशी घुसखोरांना बेड्या

Published on

शिरूर, ता. १२ : घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून बनावट आधारकार्ड व खोट्या ओळखपत्राच्या आधारे कारेगाव (ता. शिरूर) येथे गेल्या दोन वर्षांपासून अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी घुसखोरांना शनिवारी (ता.१२) अटक करण्यात आली. पुणे ग्रामीणच्या दहशतवादविरोधी पथकाने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई केली. कारेगावसारख्या गजबजलेल्या गावात चार घुसखोर राहात असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
कमरोल रमजान शेख (वय ३२, रा. दामोदर, ता. फुलताला, जि. खोलना), अकलस मजेद शेख (वय ३९, रा. उसला, ता. पोटलीपाडा, जि. गोपालगंज), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय ३५, रा. मादपपाशा, ता. कलिया, जि. नोडाईल) व जहिर अबुबकर शेख (वय ३०, रा. पिडोली, ता. कलिया, जि. नोडाईल) अशी अटक केलेल्या घुसखोरांची नावे आहेत. दहशतवाद विरोधी शाखेतील पोलिस हवालदार मोसिन बशीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध भारतीय हद्दीत बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मूळचे बांगलादेशीय नागरिक असलेले हे चौघे कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन वास्तव्यास होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, कुठलीही वैध प्रवासी कागदपत्रे मिळून न आल्याने त्यांनी भारत सरकारने अथवा भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून बनावट आधारकार्ड वापरून बेकायदा वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. कारेगावसह, रांजणगाव, ढोकसांगवी व एमआयडीसी परिसरात ते मोलमजूरीची कामे करीत होते, असे त्यांनी सांगितले.

बांगलादेशी नागरिक असलेल्या चौघांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. प्रथमदर्शनी ते मजुरीच्या निमित्तानेच या परिसरात वास्तव्यास असल्याचे तपासातून निष्पन्न झाले असले तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. नक्षलवादी कारवायांशी त्यांचा काही संबंध आहे काय, यादृष्टीने तपास केला जात आहे.
-महादेव वाघमोडे, पोलिस निरीक्षक, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे

05358

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com