केंजळे, नकाते यांना विशेष सेवा पदक जाहीर
शिरूर, ता. १४ : आपल्या कारकिर्दीत नक्षलग्रस्त भागात केलेल्या विशेष आणि उल्लेखनीय सेवेबद्दल शिरूर पोलिस ठाण्याचे प्रमुख, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व पोलिस उपनिरीक्षक हणमंत नकाते यांना राज्य शासनाचे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.
केंजळे यांनी सन २०२१ ते २०२४ या कालावधीत गोंदिया या नक्षलग्रस्त भागात काम करताना नक्षली कारवायांबरोबरच गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी विविध परिणामकारक उपक्रम राबविले. नक्षलग्रस्त कारवायांविरोधात कठोर कारवाई करतानाच त्याबाबत तळागाळात जाऊन जनजागृती केली. कायदा- सुव्यवस्था राखतानाच स्थानिक युवकांना पोलिस दलाबरोबरच शासकीय सेवेत येण्यासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले. सन २०१० ते २०१३ दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात अशाच प्रकारचे कार्य केल्याबद्दलही त्यांना राज्य शासनाचे विशेष सेवापदक मिळाले होते.
नकाते यांनी देखील नक्षलग्रस्त भागात काम करताना कठीण परिस्थितीत विशेष धैर्य आणि सेवाभावाने काम करीत स्थानिकांच्या मनात पोलिस दलाबद्दल सकारात्मक भावना निर्माण केली. त्यातून पोलिसांची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यात मोठा हातभार लागला. कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी विविध उपक्रम राबवितानाच त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मागास आदिवासी लोकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचविण्यासाठी विशेष काम केले. नक्षलविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी स्वतः धाडसी कामगिरी करताना अतिदुर्गम भागात स्थानिकांच्या मदतीने पोलिस दलाचे महत्त्व तळागाळात पोचविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.