हुशार, अभ्यासू, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व

हुशार, अभ्यासू, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व

Published on

हुशार, अभ्यासू, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व

माजी आमदार ॲड. अशोक पवार हे वकील असल्याने आम्हा वकिलांना त्यांच्याविषयी एक आत्मीयता व ओढ आहे. एक हुशार, अभ्यासू, तत्त्वचिंतक असे हे व्यक्तिमत्त्व राजकीय वाटचालीत मात्र कार्यक्षम पद्धतीने कायमच झंझावाती वाटचाल करताना आणि सतत कार्यमग्न राहून जनतेशी संपर्क ठेवताना, त्यांच्या अडीअडचणी सोडवताना दिसतेय. सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करताना त्यांनी शिरूर व हवेली तालुक्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या या योगदानाविषयीची जाण म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या मनात कायम आहे.

- ॲड. प्रदीप बारवकर, अध्यक्ष,
शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लीगल सेल

मनुष्य किंवा कुठलीही राजकीय व्यक्ती ही सत्तर टक्के समाजकारण आणि तीस टक्के राजकारण करणारी असावी, असे महात्मा गांधींचे मत होते. अशोकबापू पवार हे याच तत्त्वाचा अवलंब करणारे राजकीय नेते आहेत. शिरूर- हवेली मतदार संघाचे दोन वेळा आमदारपद भूषविताना बापूंनी या मतदार संघाच्या विकासात मोलाची भर घातली आहे. समस्येच्या मुळाशी जायचे, त्या समस्येची उकल करून जागच्या जागी सोक्षमोक्ष लावायचा हा बापूंचा पिंड. विकास कामांच्या बाबतही एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करायची, त्याबाबत परखड मत मांडायचे आणि अखंड पाठपुराव्यातून ते काम मार्गी लावायचे हेच बापूंच्या कामाचे आजवरचे सूत्र राहिलेले आहे. त्यातूनच शिरूर- हवेली मतदार संघातील अनेक विकासाच्या योजना फलद्रूप झालेल्या आहेत.
शिरूर शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोठेच म्हणावे लागेल. अनेक विकासाची कामे मार्गी लावताना त्यांनी शहरातील न्यायालयासाठी अखंड पाठपुराव्यातून तीन मजली इमारत मंजूर करून आणली. शहरात तालुका न्यायालय असून, ब्रिटिश कालीन इमारत जीर्ण झाली होती. त्यातच न्यायालयाचे कामकाज वाढल्याने जागा देखील अपुरी पडत होती. या सर्वांचा विचार करून त्यांनी शहर व तालुक्यातील सर्व वकील मंडळींशी चर्चा करून नवीन न्यायालय इमारतीचा पाया भरला. आता जुन्या न्यायालय इमारतीच्या जागी टोलेजंग तीन मजली न्यायालय इमारतीसह न्यायाधीश निवास उभे राहिले असून, बापूंनी या कामांसाठी तत्कालीन शासन दरबारी पाठपुरावा करून तब्बल ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. शिरूर न्यायालयात सध्या चार न्यायाधीश असून, लवकरच जिल्हा सत्र न्यायालयही सुरू होणार आहे. त्याबाबतची पूर्वतयारी देखील चालू आहे.
कोरोना काळात देखील बापूंनी शिरूर- हवेलीतील जनतेला मोठा दिलासा देताना गोरगरीब बांधव उपाशी राहणार नाहीत, याची खबरदारी घेतली. कोरोनाग्रस्तांना वेळेत उपचार मिळावे व त्यांची निवास व खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून कोविड सेंटर सुरू केले. त्याठिकाणी अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार झाले व त्यांना नवजीवन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com