शिरूर-पाबळ रस्त्यावर तीन पिस्तुलासह दोघांना अटक

शिरूर-पाबळ रस्त्यावर तीन पिस्तुलासह दोघांना अटक

Published on

शिरूर, ता. ३१ : शिरूर - पाबळ रस्त्यावरील आमदाबाद फाटा (ता. शिरूर) परिसरात पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ३०) रात्री शिरूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली. समीर ऊर्फ नवाब वजीर शेख (वय २०, रा. शिरटे, ता. वाळवा, जि. सांगली) व दीपक शिवलिंग वांगणे (वय २०, रा. कारेगाव, ता. शिरूर) यांच्याविरूद्ध बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली. शिरूर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिरूर - पाबळ रस्त्यावरील आमदाबाद फाटा परिसरात दोन तरुण कंबरेला गावठी पिस्तूल लावून विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळताच शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस हवालदार अक्षय कळमकर, विजय शिंदे, नीतेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, रवींद्र काळे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड या पथकाने साध्या वेशात आमदाबाद फाटा परिसरात रात्री सापळा लावला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून दुचाकीसही दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांच्याही कंबरेला गावठी पिस्तूल व खिशात दहा जिवंत काडतुसे आढळून आली. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com