शिरूरमध्ये उत्सवात सर्वधर्मीयांचा समावेश

शिरूरमध्ये उत्सवात सर्वधर्मीयांचा समावेश

Published on

शिरूर, ता. १ : सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचे योगदान आणि सहभाग असलेल्या आणि या योगदानातूनच दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या येथील श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या उत्सवाचे हे पन्नासावे वर्ष आहे. गणेशोत्सवाचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना मंडळाने विविध धार्मिक, सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून या मंडळाला गतवर्षीचा ‘गणराया ॲवार्ड’ मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह आहे.
हलवाई चौक, गेंदाबाई चौक, गांधी चौक, भाजीबाजार, महर्षी दधिची चौक या परिसरातील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन १९७५ मध्ये महात्मा गांधी मित्र मंडळाची स्थापना करून गणेशोत्सव सुरू केला. यात सुभाष पुजारी, अरुण काळे, शंकर परदेशी, भोलेनाथ परदेशी, अरुण मुसळे, दिलीप मुथा, गणपत पांढरकामे, सुभाष घोडके, कोळपकर बंधू आणि सहकाऱ्यांचा विशेष पुढाकार होता. ज्येष्ठत्वाकडे झुकलेले हे कार्यकर्ते आता सल्लागारांच्या भूमिकेत असून, अशोक काळे, शाम परदेशी, अविनाश जाधव, प्रा. सतीश धुमाळ, रणजित गायकवाड, सिकंदर मणियार, शेरसिंग परदेशी, स्वप्नील चौधरी, प्रणव मुसळे, विजय नरके, राकेश परदेशी, प्रेम मुसळे, मयूर काळे, प्रसाद लांडे, मनीष मुथा, सचिन पुजारी या नव्या पिढीने मंडळाची धुरा हाती घेतली आहे. ज्या चौकात गणपती बसविला जातो त्या परिसरात हलवायांची दुकाने मोठ्या संख्येने असल्याने गेल्या काही वर्षांपासून हे मंडळ श्रीमंत हलवाई चौक गणेश मंडळ नावाने ओळखले जाते.

मंडळाची सामाजिक बांधिलकी
श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. संजीवनी ब्लड बॅंकेच्या सहाय्याने आयोजित केलेल्या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरात १५० हून अधिक नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, हृदय तपासणी करण्यात आली. मीरा नर्सिंग होमचे डॉ. संतोष पोटे, डॉ. सुनीता पोटे यांचे शिबिराला विशेष सहकार्य लाभले.

मंडळाची वैशिष्ट्ये...
- खड्डेमुक्त मंडप
- पर्यावरणपूरक देखावे
- महिलांच्या हस्ते आरती
- दरवर्षी तुळशीची रोपे, पुस्तकांची भेट
- आदर्श शिक्षकांचा सन्मान
- गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्याची भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com