शिरूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध

शिरूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध

Published on

शिरूर, ता. २७ : ‘‘आमदारकीच्या वर्षभराच्या काळात शिरूर शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे चाळीस कोटी रुपयांचा निधी आणला असून, यापुढील काळातही शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध आहे,’’ अशी ग्वाही आमदार माउली कटके यांनी दिली.
शिरूर नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ, शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनाने झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्यासह घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहर अध्यक्ष शरद कालेवार आदी यावेळी उपस्थित होते. रामलिंग मंदिरातील पूजेनंतर माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या तर्डोबाची वाडी येथील शक्तीस्थळावर जाऊन सर्व उमेदवारांनी दर्शन घेतले. ‘बाबूराव पाचर्णे अमर रहे’च्या घोषणा देत अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीने बारामतीचा विकास केला, त्याच धर्तीवर शिरूर शहराचा सर्वांगिण विकास साधण्याचा संकल्प असून, अजितदादांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनातून हा संकल्प तडीस नेऊ, असा निर्धार आमदार कटके यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘शिरूर शहराच्या विकासासाठी देण्यासारखे आमच्याकडे खूप आहे. अजितदादांना विकासाचे व्हिजन असून, भरीव निधीतून योग्य विकासकामे करताना शहराच्या सौंदर्यात भर घातली जाईल. प्रसिद्ध उद्योगपती (स्व.) रसिकभाऊ धारिवाल, माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे व माजी नगराध्यक्ष (स्व.) शहिदखान पठाण यांचा शहर विकासाचा वारसा पुढे नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.’’
‘‘माझे सासरे माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे व माजी नगरसेवक (स्व.) गणेश पाचर्णे यांनी शिरूर शहराच्या विकासात मोलाची भर घातली. त्यांची तीच विकासाची परंपरा व जनकल्याणाची दुरदृष्टी समोर ठेवून मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहे,’’ असे ऐश्वर्या पाचर्णे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने दिलेल्या संधीचे सोने करू, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com