शिरूरमध्ये मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी

शिरूरमध्ये मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी

Published on

शिरूर, ता. ३० : शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह २४ नगरसेवकांच्या मंगळवारी (ता. २) जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरातील १२ प्रभागातील २४ जागांच्या मतदानासाठी शहराच्या विविध भागात एकूण ३६ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे.
या वेळच्या निवडणूकीसाठी १६ हजार ३०० पुरुष व १६ हजार ३९३ महिला असे मिळून एकूण ३२ हजार ९९३ मतदार आहेत. सोमवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले. मतदान प्रक्रिया शांततेत व शिस्तबद्धतेने पार पडावी यासाठी पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान मिळून एकूण १९० कर्मचारी नियुक्त केले आहे. शिरूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या पार्किंगमधील मोकळ्या जागेत बुधवारी (ता. तीन) सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली. १२ टेबलवर प्रभागनिहाय मतमोजणी होणार असून, त्यासाठी शंभर कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यापासून तीन तासात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर केले जातील, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना दोनवेळा प्रशिक्षण दिले असल्याची माहिती नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ यांनी दिली. १८००२३३२१२३ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार अथवा सूचना करू शकता, असे नगर परिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
नगर परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज व त्यासोबत सूचकांचे फॉर्म भरून घेण्याच्या कालावधीत उमेदवार, त्यांचे समर्थक व सूचकांकडून सुमारे ४५ लाख रुपयांच्या कराची वसुली झाली असून, प्रचारासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी ५२७ फलक लावले होते. त्यापोटीच्या करातून चार लाख सत्तर हजार रुपये शुल्क नगर परिषदेला प्राप्त झाले.

05888

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com