शाळांचा दर्जा सुधरविण्याला प्राधान्य : पाचर्णे

शाळांचा दर्जा सुधरविण्याला प्राधान्य : पाचर्णे

Published on

शिरूर, ता. ३० : महिलांचे आरोग्य आणि प्राथमिक शिक्षणावर अधिक भर देताना नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधरविण्याला प्राधान्य देणार असल्याचे, शिरूर नगर परिषद
निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी येथे सांगितले.
आमदार माऊली कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील विविध भागांत पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. विविध प्रभागांतील चौकांमध्ये मतदारांशी संवाद साधताना ऐश्वर्या पाचर्णे यांनी आपले विकासाचे व्हीजन नागरिकांसमोर मांडले. त्या म्हणाल्या की, महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात अजूनही हिमोग्लोबीन, रक्तगटाबाबत फारशी जागृती नाही. आरोग्यविषयक जनजागृतीसाठी वरचेवर मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करून महिलांना आरोग्याच्या मूलभूत बाबींविषयक जागृत केले जाईल.
शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना विस्कळित झोपडवासीयांचे शिस्तबद्धपद्धतीने पुनर्वसन करण्याला प्राधान्य देणार असल्याचे आणि हा आपला महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सौ. पाचर्णे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभागनिहाय उमेदवार : प्र. क्र. १ : संगीता मल्लाव, नीलेश गाडेकर, प्र. क्र. २ : अंजली थोरात, एजाज बागवान, प्र. क्र. ३ : सुनील जाधव, मनिषा कालेवार,
प्र. क्र. ४ : पूजा जाधव, अरशद शेख, प्र. क्र. ५ : प्रणिता जोशी, नीलेश लटांबळे (पुरस्कृत), प्र. क्र.. ६ : रीता गुजर, दिनेशकुमार मांडगे, प्र. क्र.. ७ : अचल फलके, सुरेखा शितोळे, प्र. क्र.. ८ : पल्लवी शहा, प्रदीप बोरा, प्र. क्र.९ : विनोद भालेराव, सविता राजापुरे, प्र. क्र.१० : स्वाती साठे, रंजन झांबरे, प्र. क्र. ११ : कुलजूप काळे, तुषार वेताळ (पुरस्कृत), प्र. क्र. १२ : अविनाश घोगरे, कल्पना थोरात.

05892

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com