

शिरूर, ता. २७ : वाई तालुक्यातील सुमारे चार हजार ५११ फूट उंचीचा कमळगड, भांबर्डे (ता. शिरूर) येथील अप्पासाहेब पवार या गिरीप्रेमीने अनवाणी पायांनी अवघ्या ३१ मिनिटांत सर केला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत प्रतिकूल वातावरण असतानाही जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा विक्रम प्रस्थापित केला.
पवार यांनी रविवारी (ता. २५) आपल्या मित्रमंडळींसमवेत ही मोहीम फत्ते केली. गिरीप्रेमी ट्रेकचे प्रमुख, इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे व रवींद्र ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उद्योजक नितीन दौंडकर यांच्या प्रेरणेतून ही मोहीम हाती घेत पूर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेतच्या इतरांना कमळगडाचा चार हजार ५११ फूट उंचीचा टप्पा सर करण्यास दोन ते अडीच तास लागले. परंतु, पवार यांनी अनवाणी पायांनी केवळ ३१ मिनिटांत ही मोहीम पूर्ण करीत गडावरील गोरख मंदिराजवळ भगवा फडकावला. त्यावेळी उपस्थित गिरीप्रेमींनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष केला.
पवार यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यातील १७ किल्ले सलग ५२ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला असून, शिवनेरी ७० मिनिटात सलग तीन वेळा, रायगड ७२ मिनिटात दोन वेळा सर केला आहे. त्यांनी कळसूबाई शिखर, हरिहर गडाची मोहीमही फत्ते केली आहे. उज्जैन, अष्टविनायक यात्रा देखील त्यांनी सायकलवरून पूर्ण केली आहे.
06063
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.