शिरूर- हवेलीच्या विकासाला ‘दादांचे’ पाठबळ

शिरूर- हवेलीच्या विकासाला ‘दादांचे’ पाठबळ

Published on

शिरूर, ता. २८ : शिरूर शहर व तालुक्याच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान खूप मोठे होते. गेल्या ३५ वर्षांत शिरूर व हवेली तालुक्याच्या विकासकामांसाठी त्यांनी सरकारच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला. यात रस्ते, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती, नळपाणीपुरवठा योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ग्रामीण भागातील पाणीयोजनांचा समावेश आहे. शिरूर- हवेली मतदार संघातील गेल्या वर्षभरातील विविध विकास कामासाठी तब्बल २३ हजार कोटी रुपयांहून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी ५३७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या निधीतून स्मारक सुशोभीकरण व इतर सुधारणांची कामे प्रगतिपथावर आहेत. शिरूर शहरात तब्बल नऊ विविध शासकीय खात्यांना एकाच छताखाली आणणारी मुख्य शासकीय इमारत उभारली. यात तहसीलदार कार्यालयाबरोबरच कृषी, उपनिबंधक, पुरवठा, सहकार निबंधक आदी कार्यालये आहेत.
शिरूर नगरपरिषदेची अत्यंत अद्ययावत तीन मजली इमारत उभी करण्यासाठी १० कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला. ऑक्टोबर २०२१मध्ये या इमारतीचे उद्‍घाटन झाले. शिरूर शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल ७० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. नगर परिषद व्यापारी संकुल, जिजामाता उद्यान उभारण्यासाठीही निधी मंजूर केला. शिरूर पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय या इमारती उभारण्यासाठीही अजित पवार यांनीच निधी उपलब्ध करून दिला.

एक तास इमारतीची बारकाईने पाहणी
विकासकामांबाबत अत्यंत जागरूक, कठोर व दक्ष असलेले अजित पवार नगर परिषद कार्यालयाच्या उद्‍घाटनासाठी १ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी सात वाजताच शिरूर शहरात आले होते. उद्‍घाटन समारंभापूर्वी त्यांनी संपूर्ण इमारत व तीन मजले पायी फिरून पाहिले. जवळपास एक तास ते या इमारतीची बारकाईने पाहणी करीत होते. यावेळी बांधकामाचा दर्जा, फर्निचरसह नळाच्या तोटीपासून ते दरवाजांना लावलेल्या स्क्रू बाबतही त्यांनी माहिती घेतली. यावेळी सोबत असलेल्या पदाधिकारी व बांधकाम कंत्राटदार यांना त्यांनी बारीक- सारीक सूचना केल्या. बांधकामातील अत्यंत किरकोळ त्रूटी निदर्शनास आणून देताना जनतेच्या पैशांतून होणारी कामे चोख दर्जाची व पुढील ५० ते १०० वर्षे टिकतील या पद्धतीची झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com