मद्यप्राशनानंतर वादातून एकाची हत्या
शिरूर, ता. १२ : शिरूर-चौफुला रस्त्यावरील करडे घाट परिसरात मद्यप्राशन करताना झालेल्या वादातून बुधवारी (ता. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी गुरुवारी (ता. १२) दोघांना अटक केली आहे.
संतोष बाळासाहेब पवार (वय २४, रा. करडे, मूळ रा. आळकुटी, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे. नितीन ऊर्फ देवा सूरज चव्हाण (रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव) व गणेश तानाजी साळुंखे (रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साधना पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास नातेवाईक असलेले चव्हाण व साळुंखे हे संतोष पवार यांना दुचाकीवरून करडे घाट परिसरात घेऊन गेले. तेथे आयएफबी कंपनीसमोर मद्यप्राशन करताना त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या दोघांनी संतोष यांच्या छातीवर व पाठीवर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

