शिरूरमध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

शिरूरमध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

Published on

शिरूर, ता. १६ : शिरूर शहर, पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने, शिवजयंतीनिमित्त व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवनाट्याचे आयोजन केले आहे. उद्यापासून हे कार्यक्रम सुरू होणार आहेत.
शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर सोमवारी (ता. १६) व्याख्यान होणार असून, नगराध्यक्षा ऐश्‍वर्या पाचर्णे व आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिरूर शहर व पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांकरिता, मंगळवारी (ता. १७) रात्री आठ वाजता महाराष्ट्राची संस्कृती या थीमवर आधारित नृत्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. नगरसेविका पूजा पोटावळे, वैभवी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्री ढमढेरे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्‍घाटन होणार आहे. बुधवारी (ता. १८) रात्री ‘रणी फडकती लाखो झेंडे’ हे २५ कलाकारांच्या अभिनयाने सजलेले स्वराजाच्या शूर शिलेदारांच्या जीवनावर आधारित शिवनाट्य होणार आहे. आमदार माउली कटके आणि उद्योजक सागर दंडवते यांच्या हस्ते या नाट्यप्रयोगाचे उद्‍घाटन होणार आहे. रयत शाळेच्या मैदानावर दररोज रात्री आठ वाजता हे कार्यक्रम होतील, अशी माहिती शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख कृणाल काळे यांनी दिली. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे संयोजन शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com