‘जागरूक नागरिक घडविणे 
उच्च शिक्षणाचे ध्येय असावे’

‘जागरूक नागरिक घडविणे उच्च शिक्षणाचे ध्येय असावे’

Published on

शिरूर, ता. १७ : ‘‘बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार उच्च शिक्षणाची उद्दिष्टे बदलणे ही काळाची गरज आहे. केवळ पदव्या देण्यापेक्षा सामाजिकदृष्ट्या जबाबदार, कौशल्यपूर्ण आणि पर्यावरणाविषयी जागरूक नागरिक घडविणे हेच उच्च शिक्षणाचे खरे ध्येय असले पाहिजे,’’ असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी येथे केले.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित केलेल्या ‘उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत डॉ. विद्यासागर बोलत होते. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्‍घाटन सोहळ्यास संस्थेचे सचिव नंदकुमार निकम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू, आंध्र प्रदेशातील विक्रमा सिम्हापुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अल्लम श्रीनिवास राव, मध्यप्रदेशातील मदन मोहन मालवीय, टीचर ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. आर. टी. बेदरे आदी उपस्थित होते. या परिषदेच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. एस. बी. भोईटे यांनी प्रास्ताविकात या परिषदेचा उद्देश विशद करताना महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पस उपक्रमांची माहिती दिली. डॉ. अतुल जेठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com