

शिरूर, ता. २५ : रांजणगाव एमआयडीसीतील कंपनी अंतर्गत वादातून एका अभियंत्याला शिरूर बायपासवर तिघांनी बेदम मारहाण केली. शनिवारी (ता. २१) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ऋषिकेश शेलार व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकृष्ण सुभाष गिरी (वय २३, रा. बाबूरावनगर, शिरूर) असे जखमी अभियंत्याचे नाव असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गिरी हे रांजणगाव येथील जाबील कंपनीत इलेक्ट्रिक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी पहाटे ते कामावर जात असताना जुडीओ मॉलजवळ आरोपींनी त्यांना अडविले. ''तू कंपनीच्या सुपरवायझरला ई-मेल का केला?'' अशी विचारणा करत आरोपींनी गिरी यांना लाथाबुक्क्यांनी व विटेने गंभीर मारहाण केली.
या हल्ल्यात गिरी यांच्या डोक्याला व बरगडीला गंभीर इजा झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिस हवालदार अनिल आगलावे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.