

शिरूर, ता. ४ : अण्णापूर (ता. शिरूर) येथील शिंदे वस्ती नजीक घोडनदी किनारी असलेले महावितरणचे दोन विद्युत रोहित्र फोडून चोरट्यांनी त्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. दरम्यान, रोहित्राचे नुकसान झाल्याने या परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला असून, ऐन उन्हाळ्यात पिकांचे पाण्यावाचून नुकसान होऊ लागल्याने स्थानिक शेतकरी हवालदील झाले आहेत. रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरीचा हा प्रकार आज सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला.
अण्णापूर भागातील महावितरणचे कर्मचारी गणेश दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अण्णापूर येथील शिंदे वस्तीजवळील पोपट शिंदे यांच्या शेताच्या बांधावर असलेले रोहित्र जमिनीवर पडलेल्या व फुटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक शेतकरी भाऊसाहेब लाळगे यांनी दिल्यानंतर सहायक अभियंता वैभव बारवकर यांनी दिघे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली.
‘‘आधीच अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर या घटनेमुळे दुहेरी संकट ओढवले असून, महावितरणने तातडीने नवीन रोहित्र बसवून द्यावे,’’ अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.