शिरूरच्या आंदोलनात वाळुंज यांचे कुटुंबीयही

शिरूरच्या आंदोलनात वाळुंज यांचे कुटुंबीयही
Published on

शिरूर, ता. २२ : परिसरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच शिरूर तालुका नशामुक्त करण्याच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या बुधवारपासून (ता. १५) सत्याग्रह आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांची आई, पत्नी व दोन्ही मुलींनी आंदोलनाच्या आठव्या दिवशी वाळूंज यांची आई, पत्नी व दोन्ही मुलींनी आंदोलनस्थळी थांबून दिवसभर अन्नत्याग केला.
दरम्यान, आंदोलनकाळात प्रांताधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यासह शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी वाळूंज यांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली. मात्र, हे प्रश्न वरिष्ठ पातळीवरील असल्याने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घ्यावी, अशी भूमिका वाळूंज यांनी मांडल्याने आंदोलनातून मार्ग निघू शकला नाही. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनीही भ्रमणध्वनीद्वारे वाळूंज यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. एक- दोन दिवसांत गिल हे शिरूरला येऊन नागरिक हिताच्या या समस्यांबाबत चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास घेऊन आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशारा वाळूंज यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com