शिवतारे मित्रमंडळातर्फे मेमध्ये विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवतारे मित्रमंडळातर्फे 
मेमध्ये विवाह सोहळा
शिवतारे मित्रमंडळातर्फे मेमध्ये विवाह सोहळा

शिवतारे मित्रमंडळातर्फे मेमध्ये विवाह सोहळा

sakal_logo
By

सासवड, ता. ६ : विजय शिवतारे मित्र मंडळाच्या वतीने मे महिन्यात सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी साठी वधु-वरांची नाव नोंदणी सुरु केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, पुरंदर, हवेली, दौंड, भोर, मुळशी, वेल्हे या तालुक्यांतील विवाहेच्छुकांना सहभागी होता येणार आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री व मंडळाचे अध्यक्ष विजय शिवतारे यांनी दिली.
शिवतारे यांनी सन २००८ मध्ये शाही सामुदायिक सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून जवळपास एक हजार वधू वरांचे संसार उभे झाले. विवाह सोहळ्यात भाग घेणाऱ्या नवदांपत्यास मणी मंगळसूत्र, हळदीची साडी, लग्नाचा शालू, नवरदेवाचे कपडे, संसारोपयोगी भांडी, मनगटी घड्याळ, बूट-चप्पल; तसेच अन्य वस्तू देण्यात येणार आहेत. सर्व वऱ्हाडी मंडळींना सुग्रास जेवणाची मेजवानी दिली जाते.
माहिती व नोंदणीसाठी संपर्क : सासवड- प्रवीण लोळे (९६८९९१८३४५) फिरोज शेख (९८८१५४८८८७), बारामती- सुरेंद्र जेवरे (९८२२३०४५५६), दत्ता गावडे (९७३०३१८३०३), इंदापूर- महारुद्र पाटील (९४२३२००८११), सुदर्शन साखरे (९१७५६२९४९६), बापू दिवेकर (९८६०३५२४९९), पांडुरंग मिरगळ (९८२२०२२९९६), खडकवासला- पूजा रावेतकर (८५५४९९१६९९), वेल्हे- कांताताई पांढरे (९९२३१८२८४४), हवेली- भानुदास मोडक (९४२२३६६५१५), अतुल दांगट (९९२२४०७०७५), भोर- रमेश कोंडे (९८८१७७९७७९).