
सासवडमध्ये शीघ्र कृती दलाचे संचलन
सासवड, ता. २२ : शहरात (ता. पुरंदर) येथे शीघ्र कृती दलासह पोलिसांनी मंगळवारी (ता.२१) संचलन कले. सासवड पोलिस ठाण्यापासून पीएमएल बसस्थानक, धान्य बाजार, चांदणी चौक, छत्रपती चौक, अमर चौक, मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्ता या परिसरात हे शिस्तबद्ध संचलन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सासवड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अलीकडील काळात भांडणे, काही ठिकाणी जीवघेणे हल्ले याचे प्रमाण वाढले आहे. या वादातून काही ठिकाणी अनेक टोळ्या तयार होत आहेत. उपोषण, निवेदने, राजकीय हस्तक्षेप यातून जातीयवाद किंवा तेढ निर्माण होण्याचा तसेच वाद वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शीघ्र कृती दलासह पोलिसांनी संचलन करण्यात आले.
संचलनात घोलप यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, पोलिस उपनिरीक्षक विनय झिंन्जूर्के, महिला पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, गोपनीय विभागाचे पोलिस नाईक लीकायत मुजावर, रूपेश भगत तसेच शीघ्र कृती दलाचे प्रमुख मोआतोशी यांच्या नेतृत्वाखाली ६० सशस्र जवान सहभागी झाले होते.
सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या व कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींनी कायदा हातात घेऊ नये. संयम आणि शांतता राखून कोणताही तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा कोणाचीही हयगय न करता कडक कारवाई करण्यात येईल.
-अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक
----------
03333