पुरंदरमधील ५५ जणांना ‘शरद भूषण’ पुरस्कार

पुरंदरमधील ५५ जणांना ‘शरद भूषण’ पुरस्कार

सासवड, ता. १० ः पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने यंदाचे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, सेवक आदी ५५ जणांना ‘शरद भूषण’ पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आदींचा समावेश होता. आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, राज्य शिक्षक नेते संभाजी थोरात आदींच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झाले.
सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात झाले. यावेळी राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, मावळते तालुका अध्यक्ष गणेश लवांडे, नूतन अध्यक्ष तानाजी फडतरे, महिला आघाडी प्रमुख प्रतिक्षा बडदे, नूतन अध्यक्षा प्रतिभा जगताप, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, सहायक आयुक्त संतोष हराळे, उपसंचालक महेश शेंडेकर, कृष्णा फडतरे, गट शिक्षणाधिकारी नीलेश गवळी, सुदाम इंगळे, प्रदीप पोमण, माणिक झेंडे आदी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते.
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शरद भूषण पुरस्कार प्राप्त शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विस्तार अधिकारी ते शिक्षकांची नावे शाळानिहाय गावे पुढीलप्रमाणे ः पांडुरंग मेमाणे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती पुरंदर), उज्ज्वला नाझरेकर (केंद्रप्रमुख, धालेवाडी), पुरस्कार प्राप्त शिक्षक - प्राजक्ता धोंगडे (घिसरेवाडी), संभाजी शेंडकर (नवनाथवाडी), गोरक्षनाथ चव्हाण (कोडीत खुर्द), संध्या पांढरे (वारवडी), मोहन जगताप (देवडी), स्वाती जगताप (खोमणेवस्ती), तानाजी बडदे (कुंभोशी), आनंद राजीवडे (देवडी), अंबिका तावरे (सुपे खुर्द), रूपेश हाडके (कुंभारवळण), गणेश देवडे (दवणेवाडी), संजीव महापुरे (काळदरी), दामोदर खोमणे (नवलेवाडी), शुभांगी धुमाळ (माहूर), रेणुका म्हस्के (वीर), उज्ज्वला कुंजीर (बनकरवाडी), प्रियांका राजीवडे (पिलाणवाडी), अरुणा लवांडे (खेंगरेवाडी), सविता लंबाते (सुकलवाडी), उल्का दुर्गाडे (वरचा मळा), दशरथ गायकवाड (ब्राम्हणदरा), विलास बोरावके (घोरपडेवाडी), पुरुषोत्तम रासकर (कवडेवाडी), ज्योती किरवे (थोपटेवाडी), नितीनकुमार पवार (पिसुर्टी), मायादेवी दरेकर (दरेकरमळा), अनिल कुंजीर (राजेवाडी) भाऊसाहेब जगताप (ढुमेवाडी), जयश्री कुंजीर (सोनोरी), बाळासाहेब कुंजीर (शिवरी), चंद्रकला भोईर (गोटेमाळ), दामोदर इंगळे (भोरवाडी), संगीता लवांडे (नाझरे सुपे), अनिता शिंदे (भोसलेवाडी), अरुणा दुर्गाडे (जुनी जेजुरी), सचिन खंडाळे (बोरावकेमळा), सुवर्णा खेडेकर (मावडी सुपे), जयश्री मेमाणे (राजुरी), बाळासाहेब भाडळे (माळशिरस), तालुक्याबाहेरील पुरस्कारप्राप्त प्राथमिक शिक्षक - संगीता मेमाणे (पाचलिंगे), महादेव शेंडकर (धनगरवस्ती), कौशल्या मेमाणे (लोणी काळभोर), कृष्णा लोकरे (येवलेवाडी), छाया शेंडकर (पाटस), दत्तात्रेय खेडेकर (सासवड), वर्षा खळदकर (सासवड), पुरस्कारप्राप्त माध्यमिक शिक्षक - शहाजी पोमण (पिंपळे), दिलीप नेवसे (यादववाडी), एकनाथ देवकर (कोथळे), संगीता रासकर (नीरा), रजनी कड (पारगाव मेमाणे), पुरस्कारप्राप्त विषय शिक्षक - दीपक पाटील (पंचायत समिती, पुरंदर), गणीभाई मुलाणी (पंचायत समिती, पुरंदर).


तिघांचा विशेष सन्मान
वाघापूर (ता. पुरंदर) येथील कन्या मधुरा संतोष कुंजीर ही आर्मीमध्ये लेफ्टनंट झाल्याबद्दल तिचा खास सन्मान पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात करण्यात आला. तर जिल्हा परिषदेचा यंदाचा जिल्हा पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले शिक्षक सोमनाथ गजरे व धनंजय जगताप यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com