सासवड येथे टेंपोच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार

सासवड येथे टेंपोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सासवड येथे टेंपोच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार
सासवड, ता. २१ : येथील शिवतीर्थ चौकाजवळ मोटरसायकल आणि टेम्पो यांच्या धडकेत ७२ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाले. सोमवारी (ता. २१) सकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे. शहाजी संताजी जगताप (देशमुख) (रा. जुने
टपाल कार्यालय, सासवड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सागर ज्ञानेश्र्वर जगताप (देशमुख) यांनी याबाबत सासवड पोलिसांना फिर्याद दिली. सासवडचा आठवडे बाजार असल्याने अपघात झाल्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com