पार्किंगच्या वादातून
सासवडमध्ये दांपत्याला मारहाण

पार्किंगच्या वादातून सासवडमध्ये दांपत्याला मारहाण

Published on

सासवड, ता. १६ : सासवड येथे वाहनांच्या पार्किंगच्या वादातून दांपत्याला मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पार्किंगच्या कारणावरून मच्छिंद्र विष्णू पवार, वैशाली मच्छिंद्र पवार, आकाश मच्छिंद्र पवार, मिलिंद इनामके, रोहीत भोईटे, श्रेयस जगताप, आनंद राजिवडे, तन्मय राजिवडे (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर) यांनी फिर्यादीसह त्यांच्या पतीला शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादीच्या पतीची अडीच ग्रॅम वजनाची सोनसाखळी गहाळ झाली, तसेच मोबाईलचेही नुकसान झाले आहे. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com