सासवडच्या शिवतीर्थावर विविध उपक्रम

सासवडच्या शिवतीर्थावर विविध उपक्रम

Published on

सासवड, ता. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय जयंती सासवड आणि पुरंदर तालुक्याच्या गावांमध्ये साजरी करण्यात आली. सासवडच्या शिवतीर्थावर शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांतून उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा झाला. माजी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत युवकांनी महाराजांना अभिवादन केले.
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप, मनोहर जगताप, नंदकुमार जगताप, सागर जगताप, डॉ. प्रवीण जगताप यांनी शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शिवजन्मोत्सव पाळणा, महाआरती, शिववंदना आदी उपक्रम झाले.
शिवतीर्थावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीपासूनच पुरंदर किल्ल्याचा रस्ता गजबजला होता. जिल्ह्यातील विविध गावांतून युवकांनी ज्योत आणण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर गर्दी केली होती. भगवे झेंडे लावून हजारो दुचाकी रात्रभर रस्त्यावरून फिरत होत्या. बुधवारी दिवसभर चौकाचौकात भगवे झेंडे, ध्वनीक्षेपकावरील पोवाडे यांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा, सरसेनापती बाजी पासलकर यांच्या समाधिस्थळी, सरदार गोदाजीराजे जगताप तसेच महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com