जमिनी वाचवण्यासाठी प्रसंगी 
तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा

जमिनी वाचवण्यासाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा

Published on

सासवड, ता. १५ : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने वनपुरी (ता. पुरंदर) येथे आयोजित निर्धार मेळाव्यात निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आणि आपल्या जमिनी वाचवण्यासाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख दत्तात्रेय झुरंगे, पी. एस. मेमाणे यांच्यासह वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, पारगाव, एखतपूर मुंजवडी, कुंभारवळण या गावांतील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोळसे पाटील म्हणाले, ‘‘जनतेला उद्ध्वस्त करून नेत्यांचा विकास करायचा, हेच सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. त्यांनी संपूर्ण देश अदानीच्या ताब्यात दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मोजणी होऊ देऊ नका. अदानीच्या लॉजिस्टिक पार्कसाठी शेजारीच विमानतळ करणार असेल, तर तुमच्या जागेवर विमानतळ का करीत नाही?’’
सरकारी अधिकारी गावात येऊन गोड बोलून सह्या घेतील आणि त्यानंतर आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कितीही विनंती केली तरी कोणीही उपस्थित राहू नका, असे सांगत पी. एस. मेमाणे यांनी विमानतळ करण्याची काही लोकांची मानसिकता असली तरी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. विमानतळाचे केवळ फायदे सांगितले जातात, तोटे सांगितले जात नाहीत. त्यामुळे सर्वांनी याचा विचार करावा. एकदा हाक दिल्यावर सर्वांनी एकाच वेळी उभे राहिल्यास प्रकल्प माघारी जाण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वासही मेमाणे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com