सासवडला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
सासवड, ता. १३: सासवड आणि परिसरात मंगळवारी (ता. १३) सकाळी दहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली.
सासवड-जेजुरी पालखी मार्गावर राजमाता जिजामाता उद्यानाजवळील सर्वच भाजी आणि फळ विक्रेत्यांच्या दुकानांचे छत अक्षरशः उद्ध्वस्त झाले. या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर सासवड-नारायणपूर मार्गावर न्यायालयाजवळ मोठे झाड उन्मळून पडले. एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. याबरोबरच सासवड परिसरात अनेक ठिकाणी तुटलेल्या फांद्यांच्या तडाख्यात काही वाहनांचे नुकसान आणि वाहतूक खोळंबा झाला.
सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते तर काही प्रमाणात गारपीट झाल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला. ज्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वेधशाळेतील व्यवस्थापक नितीन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सासवड परिसरात तब्बल ३३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नागरिकांची उडाली तारांबळ
सासवड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता जाणवत होती. वादळी वाऱ्याने आणि गारपिटीने सोमवारी सकाळी नागरिकांची तारांबळ उडवली. रस्त्यावर असलेले नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय शोधावा लागला.
वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे राजमाता जिजामाता फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या छतासह आंबा, कलिंगड, डाळिंब, केळी या फळांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
- हरून बागवान, माजी नगरसेवक, फळविक्रेते
04913
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.