राजेवाडीत वादळी वाऱ्याचा शेवग्यास फटका
सासवड, ता. २३ : राजेवाडी (ता. पुरंदर) येथील सणस मळा परिसरात बुधवारी (२१) सायंकाळी सातच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेवग्याच्या झाडांचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संपत गोविंद सणस यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सणस यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये संपत मोठ्या कष्टाने ३८० शेवग्याच्या झाडांची लागवड केली होती. कडक उन्हाळ्यात आणि पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतून विकतचे पाणी वापरून त्यांनी ही झाडे जगवली होती. खते, औषधे फवारणी आणि मशागत यासाठी त्यांनी एक लाखाहून अधिक रुपये खर्च केले होते. त्यांची ही गुंतवणूक आता निसर्गाच्या एका झटक्यात मातीमोल झाली आहे.
ही झाडे दहा ते बारा फुटांची झाली होती आणि त्यांना मोठ्या प्रमाणात शेंगाही लागल्या होत्या. फुलांचा बहरही आला होता, ज्यामुळे चांगल्या उत्पन्नाची आशा होती. मात्र, वादळी वाऱ्याने जवळपास २०० झाडे उन्मळून पडली आहेत, ज्यामुळे सणस यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, नुकसानीची दखल घेऊन कृषी विभाग आणि महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी संपत सणस तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी केली आहे.
अवकाळीने नुकसानग्रस्त काळदरी भागातील पंचनामे पूर्ण होत आले आहेत. राजेवाडी येथील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देणार आहे.
-सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी पुरंदर
04985
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.