लोकशाहीच्या रक्षणाचा सासवड येथे निर्धार
सासवड, ता. २५ : सासवड (ता. पुरंदर) येथे भारतीय जनता पक्ष, सासवड शहराच्या वतीने बुधवारी (ता. २५) आणीबाणी- काळा दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सन १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीच्या काळातील घटनांची आठवण करून देत लोकशाहीच्या रक्षणाचा निर्धार नागरिकांनी यावेळी केला.
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. माजी आमदार अशोक टेकवडे यांनी आणीबाणीमुळे लोकशाहीवर झालेल्या आघातावर प्रकाश टाकत त्या काळातील संघर्ष व बलिदानाचे स्मरण करून दिले. आणीबाणीत अटक झालेले ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पासाहेब पुरंदरे आणि प्रमोद खळदकर यांनी त्यांचे अनुभव कथन करत उपस्थितांना प्रेरणा दिली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित मोडक, सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, संदीप हरपळे, श्रीकांत थिटे, जालिंदर जगताप, जयेंद्र निकम, गणेश मेमाणे, राहुल भोंडे, सुरेश गिरमे, रूपाली क्षीरसागर, सिद्धी शेलार, उदयराज जगताप, निरंजन फडतरे, हेमंत जैन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा आणि भविष्यात असे प्रसंग पुन्हा येऊ नयेत यासाठी सजग राहण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

