जिल्ह्यातील आगामी निवडणुका 
महाविकास आघाडीतून : शेवाळे

जिल्ह्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडीतून : शेवाळे

Published on

सासवड, ता. २ : ‘‘पुणे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढविल्या जातील,’’ असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी केले.
सासवड येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. त्यांनी इच्छुक उमेदवारांना क्रियाशील सभासद नोंदणी करून जनसंपर्क वाढवण्याचे आवाहन केले. तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे यांनी तालुक्यातील पक्षिय कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील पक्षाच्या विविध कमिट्यांच्या कामकाजाची माहिती जिल्हा युवकाध्यक्ष प्रवीण गोतारणे, सागर मिसाळ, स्वराज तुपे आणि महिलाध्यक्षा भारती शेवाळे यांनी दिली. आगामी निवडणुकांमध्ये युवकांना अधिक संधी मिळावी, अशी मागणी सौरभ कुंजीर, सचिन दरेकर, संतोष कोलते, बंडूकाका जगताप, गौरव कोलते यांनी केली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, सुदामराव इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, दत्ता चव्हाण, राहुल गिरमे, बाजीराव कुंजीर, पुष्कराज जाधव यांनी पक्ष एकजुटीने जास्तीत जास्त जागांवर यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शहर अध्यक्ष विनोद जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com