सासवडला विसावा मंदिरात दर्शनासाठी गर्दी
सासवड, ता. ६ : सासवड येथील कऱ्हे काठच्या पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात तसेच संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात रविवारी (ता. ६) भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.
एकादशीनिमित्त पहाटे ५ वाजता महाअभिषेक, महापूजा झाली. महाआरती होऊन मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यंदा मंदिरात जेजुरीतील गायक दशरथ लाखे, पुरंदर कलामंचाचे सदस्य आणि मेघ मल्हार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थांनी अभंगवाणी कार्यक्रमाचे सादरीकरण केले, अशी माहिती नाना पुरंदरे व किरण पुरंदरे यांनी दिली. याप्रसंगी माजी आमदार संजय जगताप, तबला अलंकार अमोल बेलसरे, कलामंचाचे संजय काटकर, मोहन बागडे याप्रसंगी उपस्थित होते.
एकादशीनिमित्त पुरंदर कलामंच आणि संस्कार भारती पुणे विभाग यांच्या वतीने विसावा विठ्ठल मंदिरात जलरंग चित्रणवर्ग झाला. यामध्ये चित्रकार सोमनाथ भोंगळे, अमोल बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीसरातील अनेक मुलामुलींनी विठ्ठल विसावा मंदिराची चित्रे रेखाटली. दरम्यान, श्री विसावा विठ्ठल मंदिर आणि संत सोपानकाका महाराज समाधी मंदिरात संत सोपानकाका सहकारी बँक व पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था तसेच रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या वतीने भाविकांना गुडदाणी, संदीप जगताप यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले.
05226
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.