सासवडमध्ये स्वच्छता अभियानास सुरुवात

सासवडमध्ये स्वच्छता अभियानास सुरुवात

Published on

सासवड, ता. १० : सासवड (ता. पुरंदर) शहरात ‘डेंगू आजार प्रतिरोध महिना’ आणि ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ जुलै २०२५’ या अभियानांना सुरुवात झाली आहे. सासवड नगर परिषद आणि पुरंदर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पुरंदर हायस्कूल सासवड येथून या उपक्रमांचा प्रारंभ केला.
‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणणे आणि पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यात नागरिक, शालेय विद्यार्थी, बचत गट आणि शासकीय संस्थांचाही सहभाग आहे.
सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. पुरंदर हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मीरा नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी हात स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. डॉ. विक्रम काळे आणि तालुका विस्तार अधिकारी प्रकाश चवरे यांनी डेंग्यू आजाराची सामान्य माहिती, लक्षणे आणि उपचारांबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश तुळशी, आरोग्य निरीक्षक विजय सोनवणे, शहर समन्वयक राम कारंडे, आरोग्यसेवक फिरोज तांबोळी, संतोष भोसले, प्राचार्य इस्माईल सय्यद यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हे करा उपाय :
- घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवा
- निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंट्या, मोकळे डबे व बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावा
- मच्छरदाणीचा वापर करा.
- घराशेजारील डास उत्पत्तीची ठिकाणे शोधा आणि नष्ट करा
- गटारी वाहत्या ठेवा.
- पाणी साठलेल्या ठिकाणी रॉकेल किंवा जळके ऑइलचा वापर करा
- व्हेंट पाइपला जाळ्या बसवा
- घरातील मोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडा
- आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com