​अश्रू, हशा, टाळ्या अन् ‘वन्समोअर’ही 
सासवडच्या कवीसंमेलनातील दृश्‍य ः देवा झिंजाड यांना पुरस्कार प्रदान

​अश्रू, हशा, टाळ्या अन् ‘वन्समोअर’ही सासवडच्या कवीसंमेलनातील दृश्‍य ः देवा झिंजाड यांना पुरस्कार प्रदान

Published on

​अश्रू, हशा, टाळ्या अन् ‘वन्समोअर’ही
सासवडच्या कवीसंमेलनातील दृश्‍य ः देवा झिंजाड यांना पुरस्कार प्रदान

सासवड, ता. १६ : कधी काळजाला हात घालणाऱ्या, कधी हास्यरसात बुडविणाऱ्या, कधी मनाला चटका लावणाऱ्या तर कधी अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. काही कविता ऐकून श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. हशा, टाळ्यांबरोबरच ‘वन्समोअर’ने सभागृह दणाणून जात होते.
सासवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या २८ व्या आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित निमंत्रित कवी संमेलनातील हे दृष्य होते. यावेळी कवी देवा झिंजाड यांना ‘स्व. सोपानराव लांडगे यांच्या स्मरणार्थ इंदुमती लांडगे काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.​
पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात स्वप्नील पोरे, वैशाली माळी, स्वाती यादव, वसंतराव पाटील, संजय ऐलवाड, कल्पना दुधाळ, देवा झिंजाड आदी नामवंत कवींनी आपल्या कविता सादर केल्या. देवा झिंजाड यांची ‘तुव्हा जन्म झाला, तवा चिमणीत घासलेट नव्हतं...’ ही मनाला चटका लावणारी कविता, तर वैशाली माळी यांची ‘देवघर, माजघर...’ यांसारख्या गावाकडच्या आठवणी जागवणाऱ्या कवितांनी रसिकांची दाद मिळवली. याशिवाय स्वप्नील पोरे यांनी ‘शिवराय’, संजय ऐलवाड यांनी ‘बदल’ आणि कल्पना दुधाळ यांनी ‘काही काळानंतर’ या विषयांवर आपल्या रचना सादर केल्या.
यावेळी अनिल कदम, विद्या जाधव, राजेंद्र सोनवणे, सोमनाथ सुतार, जगदीप वनशिव, तानाजी जगताप, वैष्णवी कुंभारकर आणि केशव काकडे यांनीही आपल्या रचना सादर केल्या. यावेळी आरोही पवार या चौथीतील विद्यार्थिनीने आचार्य अत्रे यांच्या कार्याची महती उत्तमरीत्या सादर केली. दशरथ यादव यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत ताकवले यांनी कवींचा परिचय करून दिला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष सु. ल. खुटवड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेचे ॲड. दिलीप निरगुडे, प्रदीप पोमण, कुंडलिक मेमाणे, सुनील लांडगे, रश्मी कोलते, बाळासाहेब मुळीक, बंडूकाका जगताप, वसंतराव ताकवले, संतोष काकडे यांच्यासह अनेक काव्यरसिक उपस्थित होते.


फोटो ः 05440

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com