जिद्दीने सावरले अपंगत्वाचे आयुष्य

जिद्दीने सावरले अपंगत्वाचे आयुष्य
Published on

​सासवड, ता. १४ : रोजच्या धावपळीत काही चेहरे आपल्या अंगभूत जिद्दीने आणि अथक प्रयत्नांनी वेगळे उठून दिसतात. सासवड येथील वृत्तपत्र विक्रेता शकील सिकंदर बागवान हे असेच एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व. जन्मतः एका पायाने दिव्यांग असलेल्या शकील बागवान यांनी एका अपघातात पोलिओ झालेल्या पायात रॉड बसलेला असतानाही गेली १८ वर्षे अविरतपणे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय जपला आहे.
बागवान यांच्या व्यवसायाच्या प्रवासाची सुरुवात येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शिवाजी कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कोलते यांच्याकडे त्यांनी चार वर्षे वृत्तपत्रात पुरवण्या टाकण्याचे काम केले आणि त्यानंतर त्यांच्या वृत्तपत्रांचे वितरणही केले. कोलते यांनी त्यांना मोलाची मदत केली. तसेच, काही काळ त्यांनी मामा, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष खाजाभाई बागवान यांच्या सूचनेनुसार वृत्तपत्र विक्रेते बाळासाहेब कुलकर्णी यांच्या एसटी आगारातील दुकानातही काम केले. या सर्व अनुभवांच्या जोरावर आणि शिवाजी कोलते यांच्या मदतीने, बागवान यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या एजन्सी घेतल्या आणि सात वर्षांपूर्वी स्वतंत्र कामास सुरुवात केली. आज सासवड नगरपरिषदेच्या इमारतीसमोर त्यांचा स्टॉल शहरवासियांच्या सेवेसाठी उभा असतो.

५८६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com