सासवड- माळशिरस रस्त्यावर जीवघेणे खड्डे

सासवड- माळशिरस रस्त्यावर जीवघेणे खड्डे

Published on

सासवड, ता. ३१ : पुरंदर तालुक्यातील सासवड- माळशिरस या प्रमुख मार्गावर जीवघेण्या खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.
हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठी नाही, तर श्रीक्षेत्र भुलेश्वर या प्रसिद्ध आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या महादेव मंदिराकडे ये- जा करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेष म्हणजे, हा रस्ता पुणे- बंगलोर व सासवडहून पुढे पुणे - सोलापूर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पुरंदर तालुक्यातील नऊहून अधिक गावे या मार्गावर थेट जोडली असल्याने शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना कामासाठी सासवडला ये- जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो.
​सासवड शहरातील रस्त्यांची दुर्दशा असतानाच, सासवड- माळशिरस मार्गावर आंबोडीपासून माळशिरसपर्यंत केवळ खड्डेच खड्डे दिसत आहेत. या खड्ड्यांमध्ये आपटून अनेकांना मणक्याच्या गंभीर व्याधी जडल्या आहेत, तर वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.

लोकप्रतिनिधींची खड्ड्यांकडे डोळेझाक
​सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरंदरमधील सर्वच रस्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तसेच, दुसरीकडे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सध्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या व्यूहरचनेत गुंतले आहेत. याच रस्त्यावरून रोज ये- जा करणारे हे लोकप्रतिनिधीही खड्ड्यांकडे डोळेझाक करत असल्याने, या रस्त्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही, अशी भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

हा मार्ग ‘हॅम’कडे जाणार असून, त्यासाठी पुणे- बंगलोर महामार्गावरील कापूरहोळपासून (ता. भोर) सासवड आणि पुढे यवत (ता. दौंड) पुणे - सोलापूर महामार्ग या दरम्यानचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, सध्यातरी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, त्यांनी किमान रस्त्यावरील खड्डे बुजवावेत,
- ज्ञानेश्वर यादव, माजी उपसरपंच, माळशिरस

05937

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com