​चटणी-भाकरी विसरले... प्रचारातील तरुणाई ढाब्यांवर

​चटणी-भाकरी विसरले... प्रचारातील तरुणाई ढाब्यांवर

Published on

सासवड, ता. २६ : पूर्वी अत्यंत साधेपणाने आणि निष्ठाभावनेने चालणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आता पूर्णपणे बदलला आहे. साधारण ४० वर्षांपूर्वी, प्रचारात काम करणारे कार्यकर्ते घरातून चटणी- भाकरी बांधून घेऊन जात असत. प्रचाराच्या गाडीत मुरमुरे, फरसाण आणि कांदा यावरच भागवून ते आपल्या नेता आणि पक्षासाठी निष्ठेने काम करायचे. मात्र, आता प्रचारातील तरुणाई आता ढाब्यांवर जेवताना दिसत आहे.
आता नेते आणि कार्यकर्त्यांचेही स्वरूप बदलले आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचारही बदलला आहे. राज्यात सध्या अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. दिवसभर पदयात्रा, कोपरा बैठका, घरोघरी जाऊन भेटीगाठी घेऊन उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जोर लावून प्रचार करत आहेत. प्रचाराची वाहने कर्कश आवाज करत गल्लीबोळांतून फिरत आहेत. समाज माध्यमांतूनही आधुनिक पद्धतीने प्रचार सुरू असला तरी, या निवडणुकीचे रात्रीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.
​पूर्वी प्रचाराच्या गाडीत भेळ खाणारे कार्यकर्ते आता थेट ढाब्यांवर दिसू लागले आहेत. रात्रीच्या वेळी निवडणुकीच्या हद्दीतील प्रत्येक हॉटेल आणि ढाबे दुचाकी व चारचाकींच्या गर्दीने भरलेले दिसत आहेत. जसजशी मतदानाची तारीख जवळ येते, तससशी ढाब्यांवरील गर्दी वाढतेच आहे.
​या बदललेल्या दृश्यामुळे जुनी जाणती आणि अनुभवी मंडळी चिंता व्यक्त करत आहेत. निवडणुका तरुणाईला कोणत्या दिशेला घेऊन चालल्या आहेत? असा प्रश्न उपस्थित करत, या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे मत काही ज्येष्ठांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या प्रचारातील साधेपणा आणि निष्ठा हरवत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

​तरुणाई भरकटतेय?
​या गर्दीमध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. विशेष म्हणजे, ज्यांची मिशीही अजून फुटलेली नाही, अशी अगदी अल्पवयीन मुलेही हॉटेलांमध्ये दिसत आहेत. हॉटेल आणि ढाब्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही जेवणावळी किंवा पंगती पडत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com