प्रशासकीय दिरंगाईचा सासवडमध्ये फटका
सासवड, ता. २ : सासवड नगरपरिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. पण प्रशासकीय दिरंगाईमुळे मतदान कर्मचारी ताटकळल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.
मतदान साहित्य जमा करून घेण्यासाठी जबाबदार यंत्रणेने जवळपास दीड तास उशीर लावला. नगरपरिषदेच्या प्रांगणात सुमारे २०० ते २५० कर्मचारी अक्षरशः थंडीत गारठत बसले. याबरोबरच मतदानाची वेळ संपल्यानंतरही प्रशासनाकडून निवडणुकीची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यासाठी तब्बल साडेतीन तास उलटूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दिवसभराची मेहनत आणि रात्रीचा विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध नाराजीचा सूर उमटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

