सासवडच्या पालखी तळावर तिळगूळ समारंभ

सासवडच्या पालखी तळावर तिळगूळ समारंभ

Published on

सासवड, ता. १६ : मकर संक्रांतीचे औचित्य साधून सासवड येथील ऐतिहासिक पालखी तळावर ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकमेकांशी स्नेहभाव जपला. पत्रकार संघ सासवड शहर यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला सासवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नवीन वर्षाचे स्वागत आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास माजी आमदार संजय जगताप यांच्यासह उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, विरोधी गटनेते मंदार गिरमे, नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, ज्ञानेश्वर गिरमे, प्रदीप राऊत, वैभव टकले, स्मिता उमेश जगताप, प्रियांका जगताप, स्मिता सुहास जगताप, लीना वढणे, माजी नगराध्यक्ष हेमंत भोंगळे, कला फडतरे, नंदकुमार जगताप, अनिल उरवणे, पुष्पा जगताप, संदीप जगताप, डॉ. प्रवीण जगताप, सुनील धिवार, कुंडलिक मेमाणे, संतोष जगताप, आनंद जगताप, रमेश जगताप, इस्माईल सय्यद, वसंतराव ताकवले, दत्तात्रेय रोकडे, मोहन चव्हाण, दादा भुजबळ, मोहन जगताप यांसह विविध पक्षांचे नगरसेवक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या .पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले यांसह सर्व सदस्यांनी नियोजन केले. ‘‘निवडणूक झाली, आता सर्वांनी गट-तट विसरून सासवडच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पत्रकार संघ नेहमीच विधायक कामात पुढाकार घेतो. सर्वांच्या सहकार्याने आणि एकजुटीने आपण सासवड शहराचे नाव पुन्हा देशपातळीवर नेण्यासाठी कटिबद्ध होऊया,’’ असे आवाहन माजी आमदार संजय जगताप यांनी केले.

6282

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com