अजितदादांबद्दल प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या राजकारणाचा, समाजकारणाचा आजचा सर्वात मोठा काळा दिवस म्हटलं तर गैर ठरणार नाही. उपमुख्यमंत्री, धडाडीचे नेतृत्व, कर्तृत्ववान नेतृत्व अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, याचा मोठा धक्का बसला असून, विश्वास बसत नाही. वैचारिक मतभेद असतील तरी अतिशय सहानुभूती आणि प्रेमाने वागणारा पराकोटीच्या उंचीचा नेता, एक डायनामिक माणूस आज आपल्यात नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र, देशाची, सर्वांची हानी झाली आहे.
- विजय शिवतारे, आमदार, पुरंदर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, महाराष्ट्राचे लाडके नेते, अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, राज्यातील प्रत्येकाच्या प्रगतीसाठी त्यांच्या मनात असलेली तळमळ आपण प्रत्येकाने अनुभवली आहे. असे जिवंत मनाचे नेतृत्व अचानक आपल्याला सोडून जाणे, हे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
- संजय जगताप, माजी आमदार, पुरंदर.
अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व आणि कुशल प्रशासक काळाच्या पडद्याआड गेला आहे. केवळ एक लोकनेता म्हणून नव्हे, तर कार्यकर्त्यांचा आधारवड आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे स्थान अढळ होते. सामान्य नागरिक, शेतकरी आणि युवकांसाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय कायम स्मरणात राहतील. पुरंदर आणि सासवड भागाला बारामतीसारखे विकसित करण्याचे आणि निधी देण्याचे त्यांनी दिलेले वचन, हे त्यांच्या विकासाच्या तळमळीचे प्रतीक होते.
- वामनराव जगताप, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरंदर-हवेली विधानसभा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

